शक्तिपीठ महामार्गाची सुपीक आणि बागायती जमीन वगळून नव्याने आखणी….

सध्या महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्गासाठी शेतकऱयांकडून कडाडून विरोध होत आहे. त्यामुळे या नियोजित महामार्गावरील सुपीक व बागायती जमीन वगळून महामार्गाची नव्याने आखणी करण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतली आहे. हा महामार्ग तीन वर्षांत पूर्ण करण्याची योजना आहे. कोल्हापूर जिह्यातून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाला स्थानिक लोकांचा विरोध आहे.

त्यामुळे या जिह्यातील भुदरगड, करवीर, आजरा, हातकणंगले, शिरोळ व कागल तालुक्यांतील संपादनाची प्रक्रिया स्थगित करण्याबाबतची अधिसूचना ऑक्टोबर 2024मध्ये जारी करण्यात आली आहे. शेतकऱयांच्या संमतीनेच भूसंपादनाचे काम हाती घेण्यात येईल. सदरील आखणीत महामंडळाकडे प्राप्त झालेली सर्व निवेदने व तक्रारी विचारात घेऊन सर्वसंमत आखणीत स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार योग्य ते बदल करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली आहे. तरी सर्व जनतेने आखणी अंतिम करण्यासाठी शेतकऱयांच्या संमतीनेच भूसंपादनाचे काम हाती घेण्यात येणार आहे.