विकासकामांसाठी अनेक भागात निधी नेतेमंडळींकडून मंजूर केले जात आहेत. नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जात आहे. अनेक भागातील नागरिक आपल्या समस्या घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी निवेदनाद्वारे मागणी देखील करत आहेत. वाळवा तालुक्यातील घबकवाडी येथील शिष्टमंडळाने तामजाई मंदिरासमोर अत्याधुनिक २५ लाख रुपयांचे सभागृह बांधून मिळावे यासाठी आ. खोत यांना भेटून निवेदन दिले. घबकवाडीच्या विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन रयत क्रांती संघटनेचे संस्थापक, आ. सदाभाऊ खोत यांनी दिले.
यावेळी रयत क्रांती संघटनचे युवक प्रदेशाध्यक्ष सागर खोत, सरपंच संगीता घबक, उद्योजक अमोल पाटील, माजी सरपंच संजय कदम, सांगली अर्बन बँकेचे सल्लागार बजरंग कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. आ. खोत म्हणाले, घबकवाडी येथील विविध विकास कामाकरीता आमदार फंडासह केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून विकास निधी कमी पडू देणार नाही, यावेळी तंटामुक्तीचे अध्यक्ष सयाजीराव खोत, विनायकराव वि कदम, युवराज भारती, ग्रा. पं. सदस्या वंदना खोत, सुनील भारती, दिपकराव खोत, दिलीपराव कुंभार, धनाजीराव पाटील, हंबीरराव कदम, प्रकाश कदम, अमित घबक, अजित कदम, प्रताप कदम, कृष्णात खोत, राहुल मुळीक, दत्तात्रय डंगारणे, संजय भारती, संतोष कदम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
