पुरोगामी विचाराचा वारसा जपत वाटचाल करण्याचे शिवाजीराव आवळे यांचे प्रतिपादन

सध्या आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे सर्वाचेच लक्ष लागून राहिलेले आहे. अनेकांनी स्ववबळाचा नारा हाती घेतल्याचे चित्र दिसू लागलेले आहे. हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव येथे हॉटेल राई एक्झिक्युटिव्ह येथे शपथ परिषद आणि पदाधिकारी निवड समारंभ आयोजित करण्यात आलेला होता. यावेळी पुरोगामी विचारांचा वारसा जपत स्वाभिमानाने वाटचाल करायची आहे त्यामुळे या वाटेवर जे येतील त्यांच्यासह पुढील वाटचाल करू असे प्रतिपादन बंडखोर सेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव आवळे यांनी केले. अध्यक्षस्थानी पश्चिम महाराष्ट्र सल्लागार डॉ.बी.डी. पाटील होते. प्रारंभी महामानवांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी बंडखोर सेना पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी डॉ. बी. डी. पाटील, महिला आघाडी प्रदेश अध्यक्षपदी शिवालीताई आवळे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी दयानंद आवळे, जिल्हा अध्यक्षपदी विजय लोखंडे, महिला आघाडी सांगली जिल्हा अध्यक्षपदी संध्या सुतार, जिल्हा सरचिटणीसपदी सचिन कांबळे, पन्हाळा तालुका अध्यक्ष पदी प्रवीण फाळके, हातकणंगले तालुका उपाध्यक्षपदी राहुल देडे, हातकणंगले तालुका कार्याध्यक्ष पदी सोमनाथ पांडव, हातकणंगले तालुका युवक सरचिटणीस पदी अनोश खुडे, वाळवा तालुका महिला आघाडी अध्यक्ष पदी सुशीला जाधव यांच्या निवडी करण्यात आल्या.