आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका या मार्च एप्रिलमध्ये होणार असल्याच्या चर्चाना ऊत आलेला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी आतापासूनच तयारी होत असल्याचे दिसून येत आहे. सध्या भाजप सभासद नोंदणीसाठी कार्यकर्ते, पदाधिकारी अगदी जोमाने काम करीत असल्याचे चित्र सर्वत्रच पहायला भेटत आहे. अनेक भागाभागात बुथची व्यवस्था केल्याचे दिसत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीनं पक्ष संघटन मजबूत करणं आणि लोकांची सेवा करण्यासाठी सरकारी योजना, सामान्यांपर्यंत पोहोचवणं यासाठी निखराचे प्रयत्न म्हणून बुथवर सभासद नोंदणी व जिल्ह्यासाठी सह पालकमंत्री ही मोठी योजना समोर आणली आहे.
भारतीय जनता पार्टीन सभासद नोंदणीची मोहिम रविवारी अगदी टोकाची केली. इचलकरंजी विधानसभा मतदार संघात ४८ हजार ७५२ पर्यंत तर कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात ५१ हजार २३३ अशी उच्चांकी सभासद नोंदणी झाली असली तरी कोठा पूर्ण झाला नाही असे वृत्त प्राप्त झालेले आहे.
तर शिरोळ, हातकणंगलेत सभासद नोंदणी मंदावली आहे. त्यामुळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात पदाधिकारी बदलाच्या हालचाली वेगाने सुरु झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
जिल्ह्याच्या राजकारणात पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आ. डॉ. राहुल आवाडे, आ. अमल महाडिक ही दोन नावं वेगानं पुढं येण्याची शक्यता आहे.
