कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ, (गोकुळ ) मध्ये हातकणंगले तालुक्यातील अनेक दूध संस्था गेली अनेक वर्षे दूध पुरवठा करीत आहेत परंतु, आजपर्यंत त्यांना गोकुळ संघाचे ‘अ’ वर्ग सभासदत्व प्राप्त झालेले नव्हते. त्यांना मी संचालक झालेनंतर हातकणंगले तालुक्यातील ३६ संस्थांना अ वर्ग सभासदत्व मंजूर करून दिले आहे, अशी माहिती गोकुळ दूध संघाचे संचालक माजी आमदार डॉ.सुजित मिणचेकर यांनी दिली.
गोकुळच्या दुध पुरवठादार संस्थांना प्रमाणपत्र वितरण समारंभात मार्गदर्शन करताना सुजित मिणचेकर व उपस्थित संस्थांचे पदाधिकारी ते जनसंपर्क कार्यालयात आयोजित संस्थांना प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमात बोलत होते. पुढे बोलताना डॉ. मिणचेकर म्हणाले, गोकुळच्या माध्यमातून मिळणाऱ्या सर्व योजना या दूध उत्पादक शेतकरी यांना मिळवून देण्यासाठी दुध संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे व म्हैस दूध वाढीसाठी देखील प्रयत्न केले पाहिजेत. कार्यक्रमास प्रमुख शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले, माजी जिल्हापरिषद सदस्य महेश चव्हाण व विश्वासराव इंगवले तसेच सर्व संस्थांचे चेअरमन व सचिव यांच्यासह
अन्य मान्यवर उपस्थित होते.
हातकणंगले दूध संस्थांना गोकुळचे ‘अ’ वर्ग सभासदत्व मंजूर…
