विटा येथे एक खळबळजनक प्रकार उघडकीस आल्याने सर्वत्र तणावाचे वातावरण पसरले आहे. विटा येथील शासकीय निवासी शाळेतील २३ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली आहे. या घटनेनंतर समाजकल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे यांनी रुग्णालयाला भेट देऊन मुलांची विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सहायक आयुक्त नितीन उबाळे म्हणाले, येथील समाजकल्याण विभागाच्या शासकीय निवासी शाळेतील हजर असलेल्या ४९ मुलांपैकी २३ मुलांना उलट्या व जुलाब होत असल्यामुळे विटा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.
या विषबाधा घटनेनंतर शाळेच्या मुख्याध्यापक, गृहपाल व भोजन पुरवठादार यांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे. संबंधित विभागाचे अहवाल प्राप्त होताच कारवाई होणार आहे. विटा येथील शासकीय निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झालेल्या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून, शाळेच्या मुख्याध्यापक, गृहपाल व भोजन पुरवठादार यांना कारणे दाखवा नोटीस दिली असल्याची माहिती समाजकल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे यांनी दिली.