सगळीकडे विधानसभा निवडणूकीचे वेध प्रत्येक पक्षला आगामी सुरु झालेल्या पाहयला मिळत आहेत.निवडणूकी जोरदार हालचाली महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची सप्टेंबर मध्ये आचारसंहिता लागण्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच सांगली जिल्ह्यातील मिरज व खानापूर मतदारसंघ महाविकास आघाडी मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात जोरदार चर्चा ना उधाण आले आहे. त्यामुळे खानापूर मतदारसंघांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून कोण उमेदवार उभा केला जाणार याची उत्सुकता सुरू आहे .
सांगली जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष निरीक्षक आमदार भास्करराव जाधव यांनी जिल्हाप्रमुख संजय विभुते या एकाच नावाची शिफारस केली. असल्याची सूत्रांकडून समजते त्यामुळे या मतदारसंघांमध्ये संजय विभुतेंना उमेदवारी मिळणार की आयात उमेदवार उभा केला जाणार . हे आगामी काळामध्ये स्पष्ट होणार आहे. त्या दृष्टीने सुहास बाबर यांनी मातोश्रीवर हालचाल सुरू केली असल्याचे सद्यस्थितीला दिसत आहे .यासंदर्भातून माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.