रविवारी सुहास भैय्या आणि वैभव दादा दाखवणार ताकद….

मराठा आरक्षणाचा मुद्दा खूप दिवस जोर खात आहे. अनेक आंदोलने उपोषणे या मराठा आरक्षणासाठी जागोजागी होत आहेत. मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करणार आहेत आणि म्हणून जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी अनेक भागातून अनेक मराठी बांधव हे मुंबईसाठी रवाना देखील झालेले आहेत.

तर विट्यामध्ये मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी सुहास भैया आणि वैभव दादा ताकदीने सक्रिय झालेले आहेत. रविवारी बाईक रॅलीसाठी आणि मुंबई येथील आंदोलनासाठी राजकीय नेत्यांनी मराठी समाजाला सहभागी होण्याचे आवाहन केलेले आहे.

या रॅलीमध्ये जास्तीत जास्त मराठा बांधवांनी एकजुटीने येऊन आपला सहभाग नोंदवावा असे सुहास भैया आणि वैभव दादा यांनी जनतेस आवाहन केलेले आहे. तसेच मराठा बांधवांनी जरांगे पाटील यांच्या पाठीशी ताकतीने उभे राहण्यासाठी नेत्यांनी जनतेला जागृत देखील केलेला आहे.