खानापूरच्या विकासात स्व. अनिलभाऊंची भूमिका….

खानापूर शहरासह मतदारसंघाच्या विकासासाठी स्व.आमदार अनिलभाऊ बाबर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. मतदारसंघातील रस्ते, पाणी, वीज या सुविधा देण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळालेले आहे. आज पाणी आल्यामुळे बागायत क्षेत्र वाढवून शेतकऱ्यांना नगदी पिकांपासून चांगले पैसे मिळत आहेत. बाजारपेठेमध्ये पैसा खेळत असल्याने सर्वांना चांगले दिवस आलेले आहेत.

आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून खानापूर मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत खानापूर शहराचा ग्रामपंचायत काळातील बॅकलॉग नगरपंचायतीच्या माध्यमातून भरून निघालेला आहे. नगरविकास विभागाने कोट्यवधी रुपये दिल्याने खानापूर विकासात राज्यात पुढे आहे आणि निधीच्या माध्यमातून पाच वर्षे साथ दिली आहे. आता जनतेने या निवडणुकीत सहकार्य करावे असे आवाहन सुहासभैया बाबर यांनी केलेले आहे. खानापूर शहराचा विकास हा कायमस्वरूपी व्हावा अशी अनेक वर्षाची मागणी होती. स्व. आमदार अनिलभाऊंच्या माध्यमातून मंजूर झालेल्या पाणीपुरवठा योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.