आम. डॉ.भाई बाबासाहेब देशमुख यांनी घेतली मा.ना.श्री. प्रकाश आबीटकर साहेब यांची सदिच्छा भेट

सांगोला विधानसभा मतदारसंघातून आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांची आमदारपदी निवड झाली आहे. पदभार हाती घेतल्यानंतर त्यांनी सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न चालू केलेला आहे. आज मुंबई येथे लोकप्रिय आमदार डॉ.भाई बाबासाहेब देशमुख यांनी महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री मा.ना.श्री. प्रकाश आबीटकर साहेब यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी सांगोला विधानसभा मतदारसंघातील आरोग्याच्या समस्यांवर लवकरात लवकर उपाययोजना करण्याची विनंती केली. मंत्री महोदयांनी तातडीने यावर उपाययोजना करण्याचे अश्वासित केले.