सध्या राजकीय वातावरणात अनेक फेरबदल पहायला मिळत आहेत. राजकीय समीकरणे बदलतानाचे चित्र सध्या अनेक पक्षात दिसत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अनेक पक्षांनी स्वबळावर लढण्याची तयारीदेखील दर्शवली आहे. सध्या शिवसेना शिंदे पक्षाने आपले लक्ष कोल्हापूर जिल्ह्यात लावलेले आहे. पद, प्रतिष्ठा आणि संधी मिळूनही पक्ष वाढीसाठी होत नसलेले प्रयत्न पाहून शिवसेना शिंदे पक्षाने मुंबईतून कोल्हापूर जिल्ह्यात यंत्रणा हलवायला आरंभ केल्याची चर्चा आहे.
दरम्यान, मोठ्या १० लोकांचा प्रवेश पक्षात लवकरच होईल, असे संकेत आहेत. हातकणंगले लोकसभा मतदार संघात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली. खास. धैर्यशील माने यांना विजय मिळाला. विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात पक्षाचा एकही आमदार उभा राहू शकला नाही. कोल्हापुरातील लोकसभेचा उमेदवार जोरात पडला. विधानसभा निवडणुकीनंतर याही मतदारसंघात कोल्हापूर उत्तरमधून काहीच हालचाली झाल्या नाहीत. परिणामी आता मुंबईतून थेट हालचाली सुरु झाल्याचे कळाले आहे. पहावे लागेल मोठे नेमके प्रवेश केव्हां होतात. पण, फेब्रुवारीत शिंदेसेना धमाका उडवणार, अशी चर्चा आहे.