टेंभूची अपूर्ण कामे 100% पूर्ण करून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी देण्यासाठी सरकारकडे प्रयत्न करणार ;आमदार सुहास भैया बाबर

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये राजकीय समीकरणे बदलताना चे चित्र सर्वांनाच पाहायला मिळाले. महायुतीचे सरकार स्थापन झाले. सांगली जिल्ह्यामधील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी पाच ठिकाणी महायुती तर तीन ठिकाणी महाविकास आघाडीला यश मिळालेले आहे. खासदार,आमदारांनी जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन योजना रस्ते पाणी आणि शेतीला अखंडित वीज पुरवठा करण्याचा संकल्प बोलून दाखवलेला आहे.

तर काही आमदारांनी आपल्या मतदारसंघातील बेघरांना हक्काची घरे मिळवून देण्याचा निश्चय केलेला आहे. ग्रामीण भागातील गरजू लोकांना राहण्यासाठी घरे उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे तसेच टेंभूची अपूर्ण कामे 100% पूर्ण करून प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी देण्याचा संकल्प हा खानापूर विधानसभा मतदारसंघातील आमदार सुहास भैया बाबर यांनी केलेला आहे आणि त्या दृष्टीने सरकारकडे प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.