इस्लामपुरात शासकीय योजना जनजागृती महाशिबीर

राष्ट्रीय व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या कार्यक्रमाप्रम ाणे शासकीय योजनांची जनजागृती करण्यासाठी व लाभार्थीना लाभ देण्याच्या अनुषंगाने ११ जानेवारी रोजी इस्लामपूर येथील सर्जे राव यादव मल्टिपर्पज हॉल येथे महाशिबीर आयोजित करण्यात येत  आहे. या महाशिबीरामध्ये संबंधित विभागांनी त्यांच्याकडील योजनांची माहिती देणारे स्टॉल लावावेत. काही लाभार्थीना मान्यवरांच्या हस्ते लाभ वितरणही करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने सर्वांनी हे महाशिबीर यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष पी.के. शर्मा यांनी केले.