सध्या गुन्हेगारीच्या प्रकारात वाढ होऊ लागल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे. अनेक ठिकाणी सरकारी कामात मनमानी कारभार पहायला मिळत आहे. हातकणंगले दुय्यम निबंधक दिलीपकुमार काळे यांची अन्यत्र बदली करावी, या मागणीचे निवेदन हातकणंगले दस्त लेखनिक व मुद्रांक विक्रेता संघटना हातकणंगलेच्यावतीने सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
कार्यालयामध्ये पक्षकाराना अरेरावीची भाषा बोलणे, केबीनचे दार बंद करून नागरिकांना ताटकळत ठेवणे, १० वाजता दस्त नोंदणीला सुरुवात न करता साडेबाराच्या पुढे दस्त नोंदणी करून सर्वांना विनाकारण त्रास देणे असा उद्योग काळे करत आहेत. दिलीप कुमार काळे यांच्या काळात आतापर्यंत जास्त माहितीचे अधिकार अर्ज दाखल झाले असून सर्वजण यांच्या कामकाजाविषयी ना खूष आहेत.
त्या अनुषंगाणे कामाबाबत माहिती मागवली जात आहेत. दुय्यम निबंधक कार्यालय हे सामान्य नागरिकांचे असून सुद्धा काळे दिवसभर सगळ्यांना बाहेर तसेच दस्त बाहेर नेवून ठेवा, मला लागेल त्यावेळी मी दस्त मागवून घेतो, अशी अरेरावाची भाषा वापरतात. अशा प्रवृत्तीच्या काळे यांची अन्यत्र बदली करावी या मागणीचे निवेदन सह जिल्हा निबंधक वर्ग २, करवीर क्रमांक २ धनंजय जोशी यांच्याकडे देण्यात आले.
