ना. आबिटकर यांनी इचलकरंजीच्या पाण्यासाठी पुढाकार घ्यावा नागरिकांमधून मागणी

वस्त्रनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजी शहरासाला पाण्याची तीव्र टंचाई जाणवते. पाण्यासाठी शहरवासीयांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. इचलकरंजी शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा, दूधगंगा नदीचे पाणी शहराला मिळावे यासाठी आरोग्य मंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांनी पुढाकार घ्यावा अशी सध्या नागरिकांमधून मागणी होत आहे.