अहिल्यारत्न पुरस्काराने डॉ. सुषमा पुजारी सन्मानित 

इचलकरंजी, येथील गावभाग परिसरातील डॉ. सुषमा पुजारी (Dr. Sushma Pujari) यांना अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक ट्रस्ट आणि ऑल इंडिया धनगर समाज महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या एका शानदार सोहळ्यात हा पुरस्कार आम. रामहरी रुपनवर यांच्या हस्ते, प्रमुख पाहुणे श्रीमंत योगीराजा गायकवाड, साताऱ्याचे माजी नगरसेवक अशोकराव शेडगे, पुण्याचे उद्योगपती हनुमंतराव दुधाळ, मोटार वाहन निरीक्षक सौरभ दडस, मलकापूरचे माजी नगराध्यक्ष आबासाहेब गावडे यांच्यासह विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार वितरण सोहळ्यास माजी नगरसेवक विजय वाटेगावकर, शंकरराव वीरकर, कराड मार्केट कमिटीचे उपसभापती संभाजी काकडे.. सद्गुरु श्री साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील बळवंतराव पाटील, अहिल्यादेवी ट्रस्टचे अध्यक्ष प्रवीण काकडे, बाळासाहेब खरात, उत्तमराव गलांडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर ! नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल त्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.