खासदार धैर्यशील मानेंचा माजी खासदार राजू शेट्टी यांना दणका! हातकणंगलेत……

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये राजकीय समीकरणे बदलतानाचे चित्र सर्वांनाच पाहायला मिळाले. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण माजी सभापती सौ. पद्माराणी पाटील यांचे पती हातकणंगले पंचायत समितीचे माजी सभापती राजेश पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला रामराम ठोकलेला आहे आणि शिवसेना पक्षांमध्ये दाखल झालेले आहेत. खासदार धैर्यशील माने, शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी या विभागात आणखीन काही राजकीय टार्गेट निश्चित केलेले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाटील यांच्या गळ्यात शिवसेनेचा भगवा स्कार्फ घालून त्यांचा पक्षप्रवेश करून घेतलेला आहे. खासदार धैर्यशील माने यांनी हे राजकारण घडवले. यावेळी विभागातील काही नेते उपस्थित होते.