सांगोला शहरांमध्ये भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई

रविवारी भारतीय प्रजासत्ताक दिन संपूर्ण देशभरात साजरा होणार आहे. सर्वत्र अगदी उत्साहाने आणि आनंदाने प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. सांगोला शहरात प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्ववभूमीवर जय्यत तयारी केली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त जयभवानी चौक, वाढेगाव नाका, वासुद चौक, नगरपालिका कार्यालय परिसर आदी परिसर आकर्षक रोषणाईमुळे झगमगत्या दिव्यांनी उजळून निघाला आहे. शहरातील प्रमुख आणि रहदारीच्या चौकामध्ये आकर्षक विद्युत रोषणाईमुळ लखलखते सौंदर्य डोळ्यांचे पारणे फेडत आहे.

प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वत्र उत्साह ओसांडून वाहत असताना, सांगोला नगरपालिकेने केलेल्या विद्युत रोषणाईने शहराला वेगळे स्वरूप प्राप्त झाले आहे. सांगोल्यात प्रथमच विद्युत रोषणाई करण्यात आल्यामुळे मुख्याधिकारी डॉक्टर सुधीर गवळी यांच्या संकल्पनेतून नगरपालिकेच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे