सध्या शासनाकडून अनेक नवनवीन उपक्रम राबविले जात आहेत. जेणेकरून त्याचा लाभ प्रत्येक नागरिकाला मिळेल. शाळांसाठी देखील शासनातर्फे विविध शालेयपयोगी उपक्रम राबविले आहेत. त्यामध्ये शालेय पोषण आहार हा एक भाग आहे. शालेय पोषण आहारा हा शासनाचा विद्यार्थ्यांसाठी एक चांगला उपक्रम आहे. सांगोला तालुक्यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार पुरवठा केला जातो हा आहार ठेवण्यासाठी कमलापूर ता सांगोला येथे गोडाऊन आहे या गोडाऊन मधून सर्व शाळांना आहार पाठवला जातो .या गोडाऊन मध्ये मोठ्या प्रमाणात धान्य ठेवण्यात आले आहे.
पण या गोडाऊनमध्ये उंदराचा व घुशीचा वावर आहे सर्व साहित्यही अस्ताव्यस्त पडले आहे त्याचबरोबर तांदळामध्ये घुशीच्या व उंदराच्या लेंड्या आढळून आल्यायाबाबत सामाजिक कार्यकर्ते युवा नायक नितिनदादा रणदिवे, दीपक ऐवळे, महेश वाघमारे, प्रवीण वाघमारे, पप्पू ऐवळे यांनी हे शिक्षण विभागाच्या निदर्शनास आणून दिले. गुरुवारी रात्री उशिरा शिक्षण विभागाचे अधिकारी व अन्नभेसळ अधिकारी यांनी हे गोडाऊन सील केले आहे. याबाबतचा रिपोर्ट जिल्हाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकारी यांना पाठवू देण्यात आला आहे असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सांगोला तालुक्याला पुरवठा केला जाणारा शालेय पोषण आहार ठेवण्याच्या गोडाऊन मध्ये घुशीचा वावर असून तांदळामध्ये उंदराच्या व घुशीच्या लेंड्या आढळून आल्याने सामाजिक कार्यकत्यांनी हे निदर्शनास आणून दिल्याने हे गोडाऊन शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सील केले आहे.शालेय पोषण आहारामधील तांदळामध्ये उंदराच्या व घुशीच्या लेंड्या आढळल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
शालेय पोषण आहारामध्ये उंदराच्या लेंड्या सापडणे ही विद्याथ्र्यांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे याबाबत शिक्षण विभागाला गांभीर्य नाही. अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. शालेय पोषण आहारामध्ये लेंडया आढळणे हे केविलवाणी आहे संबंधित ठेकेदार व त्याला जबाबदार असणारे अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी अशी मागणी केली जात आहे.