प्रजासत्ताक दिनी रेवणसिद्ध मंदिर जोरदार चर्चेत…

काल संपूर्ण देशभर प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ठिकठिकाणी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण देखील करण्यात आले. अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आलेले होते. रेनावी येथील श्री रेवणसिद्ध मंदिरामध्ये प्रजासत्ताक दिनी केलेली पूजा ही लक्षवेधी ठरलेली आहे. याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडिया वर व्हायरल होताना दिसत आहे. काल प्रजासत्ताक दिनाची सुट्टी असल्याने या मंदिरात काल खूपच भाविकांनी गर्दी केली होती.

या मंदिरामध्ये महाराष्ट्र कर्नाटकसह अन्य राज्यातील लाखो भक्त येत असतात. महाराष्ट्रातील संपूर्ण शाकाहारी गाव म्हणून देखील या गावाची ओळख आहे. यावर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंगा स्वरूपात मांडलेली पूजा सर्वांच्याच आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारापासून ते मंदिराच्या गाभारापर्यंत देवाची आरास करताना देखील अत्यंत कल्पक पद्धतीने फुलांची रचना केल्याचे पाहायला मिळाले.