गोव्यातील दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाधववाडी (ता. खानापूर, जि. सांगली) येथील तरुण तेजस जाधव याला १ कोटी ७६ लाख ६८ हजार रुपयांच्या सोने तस्करीप्रकरणी अटक करण्यात आली. ट व अंतर्वस्त्रातून २ हजार ७८४ ग्रॅम सोने पेस्ट स्वरूपात आणले होते. याप्रकरणी शनिवारी जाधववाडी येथील घराची झडती घेण्यात आली.
तेजस हा ५ जानेवारी २०२४ रोजी दुबईतून एअर इंडियाच्या विमानाने गोव्यातील दाबोळी विमानतळावर आला होता. कस्टम अधिकाऱ्यांनी संशयावरून त्याची तपासणी केली. त्याने जीनपँट व अंतर्वस्त्रामध्ये २ हजार ७८४ ग्रॅम सोने पेस्ट स्वरूपात लावून आणल्याचे निदर्शनास आले.
