सांगोला येथील अंबिकादेवी यात्रेनिमित्त आज उद्या होणार जागा वाटप

सध्या अनेक भागातील यात्रा सुरु आहेत. यात्रा कालावधीत अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. परगावी असणारे लोक यात्रेनिमित्त गावाकडे येतात. आणि देवतांचे आशीर्वाद घेतात. सांगोला येथील अंबिकादेवी ची यात्रा हि गुरुवारपासून सुरु होणार आहे. सांगोला अंबिकादेवी यात्रेस गुरूवार दि.30 जानेवारीपासून प्रारंभ करण्यात येणार असून आज मंगळवार दि.28 जानेवारी व बुधवार दि. 29 जानेवारी रोजी जागा वाटप सकाळी 11.30 ते 2 व दुपारी 4 ते 6 यावेळेत करण्यात येणार आहे.

शुक्रवार दि.7 फेब्रुवारी 2025 रोजी आकर्षक दारुकामाने सांगोला यात्रेची सांगता करण्यात येणार आहे. मा.जिल्हा न्यायाधिश, पंढरपूर यांनी दि.24 जानेवारी रोजी अंबिकादेवी यात्रेचे कामकाज पाहण्यासाठी कोर्ट रिसीव्हर म्हणून सहाय्यक सरकारी वकील अ‍ॅड.सारंग वांगीकर, अ‍ॅड.विक्रांत प्रकाश बनकर, अ‍ॅड.विशालदीप विजयसिंह बाबर, अ‍ॅड.नितीन गुलाबराव बाबर, अ‍ॅड.सौ.शशिकला सुधीर खाडे, अ‍ॅड.महेंद्र मारुती पत्की यांची नेमणूक केली आहे.

सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात यात्रा भरणार असून रस्त्याच्या दुतर्फा व्यावसायिकांना जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती कोर्ट रिसिव्हर सहाय्यक सरकारी वकील अ‍ॅड.सारंग वांगीकर (मो.9420666551) अ‍ॅड.विक्रांत बनकर (मो.9307955455), अ‍ॅड.विशालदीप बाबर (मो.9822273480,), अ‍ॅड.नितीन बाबर (मो. 9405437822), अ‍ॅड.सौ.शशिकला खाडे (मो. 8552815599), अ‍ॅड.महेंद्र पत्की (मो.9403938794) यांनी दिली.