आज मंत्री ना.दत्तात्रय भरणे सांगोला तालुका दौर्‍यावर

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अनेक राजकीय समीकरणे बदललेली पहिली. सध्या प्रत्येक मतदारसंघात नेतेमंडळींनी विकासकामांवर जोर दिलेला दिसून येत आहे. तसेच त्यांचे अनेक दौरे देखील सुरु झालेले आहेत. राज्याचे मंत्री क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ दत्तात्रय भरणे हे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून ,त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे असणार आहे.

आज शुक्रवार दिनांक 31 जानेवारी रोजी दुपारी 2.00 वाजता इंदापूर जि.पुणे येथून शिवणे ता. सांगोला जि.सोलापूरकडे प्रयाण दुपारी 3.00 वाजता महुद चौक, ता.सांगोला जि.सोलापूर येथे आगमन व सत्कार समारंभास उपस्थिती. दुपारी 3.15 वाजता शिवणे, ता.सांगोला, जि. सोलापूर येथे आगमन व शिवणे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे सत्कार समारंभास उपस्थिती. दुपारी 3.25 शिवणे ता.सांगोला जि.सोलापूर येथून कमलापूर, ता.सांगोला जि.सोलापूरकडे प्रयाण. दुपारी 3.30 वाजता कमलापूर ता.सांगोला जि.सोलापूर येथे आगमन व जनाई रिसॉर्ट भुमिपुजन सोहळा व नागरी सत्कार समारंभास उपस्थिती.

दुपारी 3.45 वाजता कमलापूर ता सांगोला, जि.सोलापूर येथून आरेवाडी, ता.कवठे महाकाळ, जि.सांगलीकडे प्रयाण. व आरेवाडी ता.कवठे महाकाळ, जि.सांगली येथून सायंकाळी 4.30 वाजता कोळा, ता. सांगोला जि.सोलापूरकडे प्रयाण. सायंकाळी 4.45 वाजता अर्जुन चौक, कोळा. ता.सांगोला, जि. सोलापूर येथे आगमन व नागरी सत्कार कार्यक्रमास उपस्थिती व कोळा, ता.सांगोला जि. सोलापूर येथुन आटपाडी जि. सांगलीकडे प्रयाण करतील.