अजित पवार करणार मोठी घोषणा, लाडक्या बहि‍णींना ‘या’ दिवशी मिळणार 2100 रुपये

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचं सरकार आलं तर लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1500 ऐवजी 2100 रूपये मिळणार असल्याचे आश्वासन महायुतीकडून देण्यात आले होते.राज्यात दुसऱ्यांदा महायुतीची सरकार स्थापन झाली असून लाडक्या बहिणींच्या बॅंक खात्यात 2100 रुपये कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर आता याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

या नवीन अपडेटनुसार, लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात अर्थसंकल्पानंतर 2100 रुपये जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, राज्य सरकारच्या अर्थसंकल्पानंतर 2100 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार आहे. केंद्र सरकार 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहे.

त्यामुळे लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्यात 2100 रुपये मिळणार नाही. तर मार्च महिन्यात राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. यावेळी लाडकी बहिण योजनेबाबत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार मोठी घोषणा करू शकतात आणि एप्रिल 2025 पासून लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळू शकतात. अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.