हुपरीत विशाल तीर्थ यात्रा उत्साहात साजरी! नेत्रदीपक विद्युत रोषणाई, ऐतिहासिक देखावे

प्रत्येक भागात सण, उत्सव, अनेक प्रकारचे कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद देखील पहायला मिळतो. दोस्ती ग्रुप बाजार पेठ, हुपरी यांच्यावतीने विशाल तीर्थ यात्रा मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. दोस्ती ग्रुपच्यावतीने पारंपरिक पद्धतीने आई अंबाबाईच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. तसेच नेत्रदीपक विद्युत रोषणाईकरुन येणाऱ्या भाविकांचे स्वागत करण्यात येत होते. विविध ऐतिहासिक देखावे उभारून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कालखंडातील घटनांना उजाळा देण्यात आला होता.

विशेष आकर्षण म्हणजे राज्यांनी वसईच्या माऊलीचा केलेला सन्मानचा देखावा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. त्यावेळी परिसरातील शेकडो माता भगिनींची खणा- नारळाची ओटी भरून सन्मान करण्यात आला. यावेळी दोस्ती ग्रुपचे सचिन बेडगे, सुरज कदम, पिंटू वाघे, ऋत्विक माळी, चिनू निंबाळकर, प्रमोद जाधव, तुषार इंगळे, अनिरुद्ध भोसले, उदय गणमळे, संतोष उपाध्ये, बंडू कुंभार, गणेश कांबळे, सतिश वर्तक, यश भोसले, आराध्य बेडगे, यश वाघे, रोहित नाकिल, अनुराग रणदिवे, सार्थक ऐनापुरे, हेमंत ऐकांडे, अनिल नवाळे आदी उपस्थित होते.