मंत्री जयकुमार गोरे यांना पितृशोक! मा.आम.दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या कार्यालयात होणारी आढावा बैठक रद्द

महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा जयकुमार गोरे साहेब यांचे वडील स्व. भगवानराव गोरे यांचे आज सकाळी दुःखद निधन झाल्याने माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या कार्यालयात होणारी आजची टेंभू योजना व म्हैसाळ योजना संदर्भातील आढावा बैठक रद्द करण्यात आली.

भगवानराव रामचंद्र गोरे यांच्यांवर मागील काही दिवसांपासून पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान, मंगळवारी उपचारादरम्यान, त्यांची प्राणज्योत मालवली. सातारा जिल्ह्यातील बोराटवाडी येथील निवासस्थानी त्यांचे पार्थिव आणण्यात येणार असून दुपारी ४ वाजेपर्यंत त्यांचे अंतिम दर्शन घेता येईल.त्यानंतर ४ वाजता बोराटवाडी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या पश्चात अंकुश, जयकुमार, शेखर ही तीन मुले, मुलगी सुरेखा, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.