इचलकरंजी महापालिका घरफाळा वसुलीसाठी अॅक्शन मोडवर

सद्या प्रत्येक भागात वसुली मोहीम सुरु केलेली आहे. पाणीपट्टी, घरफाळा वसुली बाबतीत काटेकोरपणे वसुली मोहीम चालू असून पाणीपट्टी घरफाळा भरून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. इचलकरंजी महानगरपालिकेचा  कर विभाग घरफाळा वसुली संदर्भात अॅक्शन मोडवर आला असून सलग दुसऱ्या दिवशी घरफाळा वसुली पथकाकडून ५ मिळकती सील करण्यात आल्या. तर तीन मिळकतधारकांचे नळ कनेक्शन बंद करण्यात आले आहे.

यावर्षीचे घरफाळा वसुलीचे ध्येय साध्य करण्यासाठी कर विभागाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून सदरची मोहिम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे कर निर्धारण अधिकारी आरिफा नुलकर यांनी सांगितले. इचलकरंजी महानगरपालिकेच्या कर विभागाच्यावतीने बुधवारी शहरातील ३ मिळकत धारकांचे नळ तोडले होते. तर दोन मिळकती सील केल्या होत्या. सदरची मोहिम तशीच तीव्रपणे राबविण्यात येत असून गुरुवारी पुन्हा वसुली पथकाकडून आहे.

शहरातील मिळकती सिल करण्याचा धडाका सुरूच ठेवण्यात आला होता. यामध्ये पथक क्रमांक ५ च्यावतीने वार्ड नंबर २२ मधील घरफाळा थकित असणाऱ्या ४ मिळकती सील केल्या. तर पथक क्रमांक ४ यांनी वार्ड नंबर २० मधील १ मिळकत सिल केली.

तर पथक क्रमांक १ च्यावतीने वार्ड क्रमांक १ मधील तीन मिळकतींचे नळ कनेक्शन बंद करण्यात आले आहे. दरम्यान, यावर्षी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या विभागाच्या कर्मचाऱ्यांची नेमणूक झाल्यामुळे कर निर्धारणाचे उद्दिष्ट साध्य करणे शक्य झाले नाही. त्यामुळे महानगरपालिकेच्या कर विभागाच्यावतीने डिसेंबर महिन्यापासून थ घरफाळा वसुलीसाठी ५ पथकांमार्फत मोहीम राबवली जात आहे.