अनेक भागात विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळतो. खानापूर येथे शनिवारी साजरी होणा-या गणेश जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. खानापूर बसस्थानकातील गणेश मंदिरामध्ये शनिवार दि. १ फेब्रुवारी रोजी साज-या होणा-या गणेश जयंती निमित्त भजन, कीर्तन व अथर्वशीर्ष पठण आदी होणाऱ्या कार्यक्रमासाठी खानापूर परिसरातील गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
खानापुरात उद्या गणेश जयंतीनिमित्त कार्यक्रम…..
