विट्याच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा ; आम. सुहास बाबर

मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक उपाध्यक्ष व माजी अध्यक्ष चिंतोपंत (आण्णा) गुळवणी यांची १८ वी पुण्यतिथी मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विटा शहराच्या जडणघडणीत स्व. चिंतोपंत (आण्णा) गुळवणी यांचा सिंहाचा वाटा आहे हे कोणी सांगायची गरज नाही, असे प्रतिपादन आ. सुहास बाबर यांनी केले.  यावेळी अध्यक्ष डॉ. मेघा गुळवणी, सचिव देवदत्त राजोपाध्ये व विनोद गुळवणी यांच्यासह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी अण्णांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. 

यावेळी आमदार सुहास बाबर यांनी स्व. अण्णांच्या आठवणींना उजाळा देताना आण्णांची शिक्षणाविषयीची तळमळ व त्यांनी आम्हांला दिलेले प्रेम कधीही न विसरण्यासारखे आहे. माझ्यासारख्या तरुणाला त्या काळी जीवनप्रबोधिनी शैक्षणिक संस्थेसाठी मोलाचे सहकार्य करून पाठीवर प्रेरणादायी थाप देऊन उर्जा दिली. असल्याचे सांगितले. संस्थेचे कार्यवाह बंडोपंत राजोपाध्ये यांनी संस्थेचे माजी अध्यक्ष व विटा बँकेचे चेअरमन विनोद गुळवणी आणि तात्यासाहेब कोरे यांनीही स्व. आण्णांच्या आठवणींना उजाळा दिला.