सह्याद्री मल्टीपर्पज लॉनचे उद्घाटन नुकतेच पार पडले. यावेळी सह्याद्री मल्टिपर्पज लॉन शहराच्या वैभवात भर घालेल, असे प्रतिपादन माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी केले. आ. पाटील म्हणाले, आदर्श शिक्षक दीपक मेथे-पाटील यांनी लोकांची गरज ओळखून २५ हजार स्क्वेअर फूट एरियामध्ये सुसज्ज सह्याद्री मल्टीपर्पज लॉन उभे केले आहे. आता परिसरातील लोकांना दूर जाण्याची गरज भासणार नाही ही सर्व व्यवस्था उपलब्ध झाली आहे.
जवळपास हजार ते दीड हजारांपेक्षा जास्त खुर्च्या बसतील एवढे प्रशस्त लॉन ६० बाय २३ स्टेज तसेच २३० मीटरचा वॉकिंग ट्रॅक उपलब्ध करून दिलेला आहे. लोकांच्या अपेक्षेप्रमाणे या लॉन व्यवस्था केलेली आहे. वैभव शिंदे म्हणाले, दीपक मेथे निसर्गाच्या सानिध्यात नियोजनबद्ध सुसज्य आशा सह्याद्री मल्टिपर्पज लॉनची निर्मिती केली आहे. छोट्या मोठ्या विविध सांस्कृतिक व इतर मंगल कार्यासाठी हा हॉल नागरिकांच्या पसंतीस उतरेल.