खानापूर मतदार संघातील तलाव सुशोभीकरणासाठी साडेनऊ कोटीचा निधी मंजूर!


खानापूर मतदार संघातील पारे ( दरगोबा),ढवळेश्वर (विटा), व आटपाडी विधानसभा मतदारसंघांमधील तीन तलावांच्या सुशोभीकरणासाठी आ. अनिलभाऊ बाबर यांच्या प्रयत्नातून साडेनऊ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी दिली.
बाबर पुढे म्हणाले, विधानसभा मतदारसंघांमधील तीन तलावांच्या सुशोभीकरणासाठी सुमारे साडेनऊ कोटीचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये ढवळेश्वर (विटा), पारे (दरगोबा) व आटपाडी या तलावांचा समावेश आहे. या तिन्ही तलावांचे किनारा सौंदर्यीकरण, हरित पट्टा, संरक्षक भिंत, हायमास्ट पोल, मनोरंजनासाठी बालोद्यान, नौकाविहार व स्वच्छतागृहे इ. अशा पध्दतीने कामे करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी दिली.

बाबर पुढे म्हणाले राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत राज्य शासनाच्या वतीने तलावांच्या सुशोभीकरणासाठी निधी दिला जातो, राज्यातील तलाव सरोवरे व मोठे जलाशय पर्यावरणदृष्ट्या संवर्धन करण्यासाठी राज्य शासनाने सन २००६ ते २००७ या आर्थिक वर्षापासून ही योजना सुरू केली आहे. यामध्ये तलावाच्या पाण्याचे प्रदूषण करणारे स्त्रोत निश्चित करून प्रदूषण रोखणे, तलावात साचलेला आवश्यक घातक गाळ काढणे, तलावाची गुणवत्ता टिकवण्यासाठी प्रयत्न करणे, तलावातील अनावश्यक व उपद्रवी वनस्पती नष्ट करून त्यांची वाढ नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना करणे, तलावातील जैविक प्रक्रियेद्वारे पाण्याची गुणवत्ता सुधारणे, यासह किनारा सौंदर्य सौंदर्यीकरण, हरित पट्टा विकसित करणे, तलावाला कुंपण तयार करणे, मनोरंजनासाठी बालोद्यान, नौकाविहार व स्वच्छतागृहे यामध्ये उभारण्यात येणार असल्याची माहिती बाबर यांनी दिली आहे.