प्रत्येक भागाच्या विकासासाठी त्या त्या भागातील नेतेमंडळींचे प्रयत्न सुरु असतात. भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या ताब्यात असलेल्या वासूद ग्रामपंचायतीचे सरपंच जयश्री अरुण केदार यांनी राजीनामा दिल्यानंतर गुरुवार ३० जानेवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालयात नूतन सरपंच निवडीची प्रक्रिया पार पडली. यावेळी निवडणुक निर्णय अधिकारी मंडल अधिकारी एम.जी.जाधव, तलाठी मस्के मॅडम, ग्रामविकास अधिकारी बाबासो नरळे यांनी काम पाहिले. यावेळी सरपंच पदासाठी भाजपच्या श्रीमती विठाबाई शिवाजी चव्हाण यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.
सरपंचपदी श्रीमती विठाबाई शिवाजी चव्हाण यांची बिनविरोध निवड होताच भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा केला. यावेळी उपसरपंच अनिल उर्फ बंडू केदार, माजी सरपंच जयश्री अरुण केदार, माजी सरपंच कलावती संदीपान केदार, ग्रामपंचायत सदस्य बबन ऐवळे, अंकुश खटके यांच्यासह तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब एकनाथ केदार, बाळासाहेब एकनाथ केदार, मोहन विठ्ठल साळुंखे, विष्णुपंत केदार, विश्वंभर केदार, चेअरमन पांडुरंग केदार, अंकुश सावंत,
मेजर अरुण केदार, सौदागर केदार, नवनाथ केदार, गोरख केदार, अजित गोडसे, समाधान सावंत, रणजित सावंत, दत्तात्रय ऐवळे, नवनाथ आदलिंगे, धनाजी राऊत, नितीन केदार, सोमनाथ पवार, गोपी केदार, जोतीराम केदार, तानाजी खटके, संभाजी चव्हाण, जयवंत केदार, बाळासाहेब केदार, दगडूआप्पा केदार, सुनील सावंत, दीपक शिंदे, सेनापती केदार यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वासूद गावाच्या सर्वागीण विकासासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. वासूद गावच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. गावाचा विकास करणे हा माझा ध्यास असल्याने अधिकाधिक निधी आणण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे, अशी ग्वाही भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली.