इचलकरंजीत काँग्रेसची महात्मा गांधीना आदरांजली

काल महात्मा गांधी यांची ७७ वी पुण्यतिथी. इचलकरंजी शहरात महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहण्यात आली. देशाला अहिंसक मार्गाने स्वातंत्र्य मिळवून देणारे महात्मा गांधीना त्यांच्या ७७ व्या पुण्यतिथी निमित्त आदरांजली वाहणेत आली. काँग्रेसचे कार्यकर्ते पप्पु दास यांनी त्यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पन करुन गांधी विचारच भारत देशाला स्वयंपूर्ण व महासत्ता बनवेल अशा भावना व्यक्त केल्या. यावेळी प्रयागराज येथे झालेल्या अपघातामधे दगावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहणेत आली.

यावेळी शशांक बावचकर, बाबासो कोतवाल,युवराज शिंगाडे, किशोर जोशी, सचिन साठे, अनिल पच्छिंद्रे, राजु काटकर, ,दिलीप पाटील, ओंकार आवळकर, अजित मिणेकर, वेदिका कळंत्रे, राजन मुठाणे, ताजुद्दीन खतीब, अरविंद धरणगुतीकर, योगेश कांबळे,अनिल कदम,अविनाश बाळीकाई इ कार्यकर्ते उपस्थित होते.