एकीकडे विधानसभेची रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे शेकापमधील सध्याचे नेतृत्व पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्याला विश्वासात घेत नसल्याने तसेच अंतर्गत गटबाजीला कंटाळून सांगोला तालुक्यातील तरंगेवाडी, भोपसेवाडी, आगलावेवाडी येथील शेकापच्या कार्यकर्त्यांनी दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करून ठाकरेंची धगधगती मशाल हाती घेतली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंच्या उपस्थितीत दिपकआबा साळुंखे पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ठाकरेंच्या मशालीची सर्वात जास्त धग शेकापला जाणवली आहे. विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवारी दिपकआबा साळुंखे पाटील यांना जाहीर झाल्यानंतर शेतकरी कामगार पक्षाला मोठी गळती लागली आहे. एक-एक करत अनेक नेते, पदाधिकारी कार्यकर्ते अखेरचा रामराम करीत पक्ष सोडून दिपकआबांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करीत आहेत.
तरंगेवाडी, भोपसेवाडी, आगलावेवाडी येथील गावातील शेकापच्या कार्यकर्त्यांनी अखेरचा रामराम करीत दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना सांगोला तालुक्यातील तरंगेवाडी येथील सचिन खांडेकर, भाऊसाहेब आगलावे, अमोल गरंडे, भोपसेवाडी येथील विलास बाबा वगरे, सुरेश नरळे, प्रशांत आगलावे, संतोष नरळे, कोंडीबा नरळे, सुशांत नरळे, गोरख नरळे, आबासो नरळे, भगवान कोळेकर तसेच आगलावेवाडी येथील प्रकाश मोहिते, रामा खुळे, शिवाजी माळी, स्वप्निल माळी, वैभव श्रीराम, रामचंद्र आगलावे, अंकुश बुरंगे या कार्यकर्त्यांनी शेकाप पक्षाला अखेरचा रामराम ठोकत दिपकआबांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करून ठाकरेंची मशाल हाती घेतली.