टीव्ही, मोबाईल, औषध आणि इलेक्ट्रिक कार होणार स्वस्त, अर्थसंकल्पात घोषणा.
मोबाईल फोन, एलईडी, एलसीडी टीव्ही , चामड्याच्या वस्तू स्वस्त होणार आहेत.
किसान क्रेडीट कार्डवरील कर्ज मर्यादेत 3 लाखांवरून 5 लाख रुपयांपर्यंत वाढ
शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा.. किसान क्रेडीट कार्डवरील कर्ज मर्यादेत 3 लाखांवरून 5 लाख रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
डिकल कॉलेजमध्ये 75 हजार जागा वाढवणार
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. पुढील वर्षापासून मेडिकल कॉलेजमध्ये 75 हजार जागा वाढवण्यात येणार .
आयआयटीच्या 6500 जागा वाढवणार
देशात 3 AI एक्सल्स सेंटर उभारणार
18 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 70 हजारांची सूट
नव्या कररचनेअंतर्गत 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर नाही.
महिन्याला 1 लाख उत्पन्न असणाऱ्यांना कुठलाही कर नाही.
18 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 70 हजारांची सूट
25 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 1 लाख 20 हजारांची सूट
डाळींमध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी 6 वर्षांचा कार्यक्रम
डाळींमध्ये स्वावलंबी होण्यासाठी सरकार 6 वर्षांचा कार्यक्रम सुरू करणार असून, तूर, उडीद आणि मसूर या पिकांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल. भाजीपाला आणि फळांचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि किफायतशीर दर देण्यासाठी व्यापक कार्यक्रम सुरू केला जाईल, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.
12 लाख रुपयांपर्यंत इन्कम टॅक्समध्ये सूट
नव्या कररचनेअंतर्गत 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर नाही
ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी घोषणा , टीडीएसची मर्यादा 1 लाखांपर्यंत वाढवली
नवीन आयकर विधेयकामुळे गुंतागुंत कमी होणार.
मध्यमवर्गीयांच्या उत्पन्नात वाढ करणं हे नव्या विधेयकाचं उद्दिष्ट.
टीडीएसमध्ये सुलभता आणणार.
ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएसची मर्यादा 1 लाखांपर्यंत वाढवली.
आयकर भरण्याची मर्यादा 4 वर्षांपर्यंत वाढवली. 4 वर्षांपर्यंत अपडेटेड टॅक्स रिटर्न भरू शकता.
व्हिजासाठीचे नियम सोपे करणार
व्हिजासाठीचे नियम सोपे करणार. LIVE व्हिसाची पद्धत आणखी सोपी होणार,भारतात उपचार घेऊ इच्छिणाऱ्यांना सहज व्हिसा मिळणार.
भगवान बुद्धांशी संबंधित जागांचा विकास करणार.
36 जीवनावश्यक औषधांना करामध्ये सूट
36 जीवनावश्क औषधांना करामध्ये सूट जाहीर, कॅन्सरची औषधं स्वस्त होणार, कॅन्सरच्या 36 औषधांवरची कस्टम ड्युटी हटवली.
पोस्ट ऑफिस क्षेत्रातील बदल
इंडिया पोस्टचे मोठ्या सार्वजनिक लॉजिस्टिक संस्थेत रूपांतर होणार.
शिक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सुधारणा
आयआयटी क्षमतावाढ प्रकल्प
पाच आयआयटींमध्ये अतिरिक्त पायाभूत सुविधा विकसित केल्या जातील
आरोग्य आणि रोजगारावर आमचं लक्ष
आरोग्य आणि रोजगारावर आमचं लक्ष, पुढती 5 वर्ष विकासाची संधी देणार.
पुढील आठवड्यात नवीन आयकर विधेयक आणणार
पुढील आठवड्यात सरकार नवीन आयकर विधेयक आणणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केलं. नव्या आयकर विधेयकाचा टॅक्स स्लॅबशी संबंध नाही. नवीन बिल म्हणजे आयकराच्या पद्धतीत बदल.
गंभीर आजाराची 36 औषधे ड्युटी फ्रि