विटा एमडी ड्रग्ज प्रकरण : परजिल्ह्यातील संशयित एजंट रडारवर 

विटा येथील कार्ये औद्योगिक वसाहतीत असलेल्या इंडस्ट्रीजवर छापा टाकून २९ कोटीचे एमडी ड्रग्ज एलसीबीच्या पोलिसांनी जाम केले. याप्रकरणी एलसीबीच्या दोन पथकांकडून कसून चौकशी सुरू आहे. परिजिल्ह्यातील काही एजेंट आला पोलिसांच्या रडारवर असून त्यांच्या लवकरच मुसक्या आवळल्या जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिघांना आज न्यायालयात हजर केले असता दहा दिवसांची वाढवीव पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. हुदीप धानजी बोरिचा (वय ४१, उत्तीया कोवा, जि. सुरत, गुजरात), सुलेमान जोहर शेख (३२, मुंबई), बलराज अमर कातारी (२४, साळसिंगे रस्ता, विरा) अशी त्या तिघांची नावे आहेत, अशी माहिती ‘एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी पत्रकारांना दिली.

कायें येथील औद्योगिक वसाहतीमध्ये एमडी ड्रग्जचा कारखाना सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर ‘एलसीबीच्या पथकाने छापा टाकला होता. यावेळी एका चारचाकीतून एमडी ड्रग्जचा साठा घेऊन चाललेल्या बलराज कातारी याला पकडले. त्यानंतर कारखान्यातील खुदीप बोरिचा सुलेमान शेख या दोघांना ताब्यात घेत अटक केली. २९ कोटी रुपयांचा एमडी ड्रग्ज साठा जप्त केला. विटा पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाकडे तपास सोपवला आहे. संशयित रहूदीप  बोरिचा, सुलेमान शेख आणि बलराज कातारी या तिघांची मुंबईतील आर्थर रोड कारागृहात असताना ओळख झाली होती.

तेव्हाच त्यांनी कारागृहातून बाहेर आल्यानंतर एमडी ड्रग्जचे उत्पादन करण्याचे ठरवले होते. बोरिया याच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. अटक करण्यात आलेल्या दोघांकडून आणखी काही माहिती व चौकशीसाठी पोलिस कोठडी वाढवण्याची मागणी पोलिसांनी केली. त्यानुसार दहा दिवसांची कोठडी बवण्यात आली आहे. कार्ये येथील औद्योगिक वसाहतीमध्ये माऊली इंडस्ट्रीज या बंद पडलेल्या कारखान्याचे शेड भाडयाने देण्यात आले होते. त्याठिकाणी अत्तर उत्पादन करण्यासाठी मासिक तीस हजारांचे भाडे आकारण्यात आले होते. त्या नावाखाली ड्रग्ज तयार केले जात असल्याचे समोर आहे. त्यानुसार आता जागा मालकास नोटीस बजवण्यात आल्याचे समजते आहे.