सांगोला महाविद्यालयातील भूगोल विभागाची सांगोला तालुका शेतकरी सहकारी सूतगिरणीस अभ्यास भेट संपन्न झाली. सदर भेटीचा उद्देश भूगोल विषयात विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये असणाऱ्या प्रात्यक्षिक प्रकल्प तयार करणे हा होता. त्यामध्ये विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्राची सखोल माहिती उपलब्ध करून देण्यात आले. अभ्यास भेटीदरम्यान सुतगिरणीच्या संपूर्ण प्रक्रियेबद्दल विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव घेता आला. सूतगिरणी येथील श्री. बसवराज बालन यांनी विद्यार्थ्यांना कापूस खरेदी पासून ते सूत तयार होईपर्यंत त्याची सविस्तर माहिती सोप्या भाषेत समजावून दिली.
विद्याथ्र्यांनी कापस खरीदीपासून ते धाग्या तयार होण्याची संपूर्ण प्रक्रिया अगदी जवळून अनुभवली, आणि तेथे असणा-या कामगारांशी चर्चा सुद्धा केली. शेवटी सूतगिरणीचे प्रशासकीय व्यवस्थापक (HR) श्री. विजय वाघमोडे यांनी विद्यार्थ्यांबरोबर चर्चा केली. या भेटीसाठी सूतगिरणीचे उपाध्यक्ष श्री. नितीन गव्हाणे व सर्व संचालक मंडळ यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच सांगोला महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. सुरेश भोसले, भूगोल विभागप्रमुख प्रा. संतोष कांबळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या भेटीसाठी प्रा. ए. एम. पवार, प्रा. व्ही. एम. उबाळे व प्रा. एस. जी. पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.