खानापूर येथील एसटी बसस्थानकामध्ये स्व. आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या प्रथम पुण्यतिथी स्मरणार्थ आमदार सुहास बाबर, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अमोल बाबर यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेते राजाभाऊ शिंदे, उद्योजक अनिल शिंदे, जिल्हा मजूर फेडरेशनचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब भोसले, पोसेवाडीचे माजी सरपंच श्रीकांत जाधव, राजू गोरे, असलम मुजावर, विकास पवार, डी. बी. माने, खानापूरचे माजी सरपंच धनंजय डोंगरे, अनिल कदम, गौतम मोरे यांच्यासह मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
अनिल बाबर यांच्या प्रथम स्मरणार्थ खानापूर बसस्थानकामध्ये वृक्षारोपण
