इचलकरंजीची महिला अपघातात जागीच ठार; एकावर गुन्हा

जयसिंगपूर येथील कोल्हापूर सांगली महार्गावर ट्रॅक्टर आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात विमल लक्ष्मण भिसे या महिला जागीच ठार झाल्या. तर लक्ष्मण भाग्यवंत भिसे हे जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली. या अपघात प्रकरणी बंडू सुरेंद्र नागावे यांच्याविरोधात जयसिंगपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, भिसे पती पत्नी हे इचलकरंजीहुन सांगलीकडे दुचाकीवरून जात होते.

यावेळी सकाळी नऊच्या सुमारास जयसिंगपूर येथील सांगली-कोल्हापूर महामार्गावरील हॉटेल पॅराडाईज समोर आल्यानंतर ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील विमल भिसे या जागीच ठार झाल्या. तर लक्ष्मण भिसे हे जखमी झाले. याप्रकरणी जखमी भिसे यांनी जयसिंगपूर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.