सांगली येथील कॅफेमध्ये घडलेल्या गैरप्रकारानंतर विटा पोलिसही खडबडून जागे झाले असून त्यांनी शहरात कार्यरत असलेल्या कॅफेवर करडी नजर ठेवली आहे. गैरप्रकार रोखण्यासाठी कॅफेसह शहरातील लॉजसुद्धा आता पोलिसांच्या रडारवर आल्याने संबंधित मालकांनी धसका घेतला आहे.विटा पोलिसांनी शहरातील कॅफेवर नजर ठेवली असून .
अचानक कॅफेची तपासणी करण्याचे निश्चित केले आहे. शहरात पाच कॅफे असून त्यांनी परवानगी घेतल्याचे पोलिस सांगत आहेत. परंतु, परवानगी घेतली असली तरी कॅफेतील हालचालीवर लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले .