महापालिकेच्यावतीने घरफाळा वसुली मोहिम तीव्र! दोन दिवसात सहा मिळकतींवर जप्तीची कारवाई

सध्या इचलकरंजी महापालिकेने तीव्र मोहीम हाती घेतली आहे. मार्च महिन्यात शंभर टक्के घरफाळा वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे ठरविले असून त्यानुसार तीव्र वसुली सुरु झाली आहे. इचलकरंजी महापालिकेच्यावतीने घरफाळा व पाणीपट्टी वसुलीची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. कर विभागाकडून दोन दिवसात सहा मि ळकती जप्त करण्यात आल्या आहेत. तर आठ मि ळकतींचे नळ कनेक्शन तोडण्यात आले आहेत. 

इचलकरंजी महानगरपालिकेच्या कर विभागाचे आर्थिक वर्ष संपत आले असतानाही घरफाळा वसुलीचे उद्दिष्ट अद्याप साध्य करता आले नाही. त्यामुळे घरफाळा वसुलीची मोहीम अधिक तीव्र करण्याचा निर्णय महापालिकेच्या कर विभागाने घेतला होता.

त्यानुसार फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये सुरुवातीच्या दोन दिवसांमध्ये वसुली पथकाने सहा मिळकती जप्त केल्या आहेत. मार्च महिना नजीक येत असल्याने महानगरपालिकेच्यावतीने घरफाळा वसुलीचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याचे ठरवले असून त्यानुसार महापालिकेच्या पाच पथकांच्यावतीने घरफाळा वसुलीची मोहीम तीव्रपणे राबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.