मँचेस्टर आघाडीचा इचलकरंजीतील पूरग्रस्तांना आधार….


सध्या इचलकरंजीत पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे. अनेक कुटुंबाचे स्थलांतर देखील करण्यात आलेले आहे. इचलकरंजी म. न. पा. चे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या आवाहनानुसार जुना चंदर रोड येथील हुतात्मा बाबू गेनू शाळेमध्ये मँचेस्टर विकास आघाडीच्यावतीने पूरग्रस्तांसाठी २५० जणांची भोजन व अल्पोपहार व्यवस्था करण्यात आली. इचलकरंजी शहर मँचेस्टर विकास आघाडी प्रमुख सागर चाळके, तानाजी भोसले, युवा नेते शेखर पाटील, प्रमोद बचाटे, आकाश माने, राजू पुजारी, सुनील हालगेकर, पिरगोंडा पाटील, रावसाहेब तिप्पे, गुंडाप्पा जावळकोटी, रामा बागलकोटे, जितेंद्र पाटील, सुशांत कोटगी, जुना चंदुर
रोड येथील परिसरातील पूरग्रस्त नागरिक उपस्थित होते.