आता पानटपऱ्यांवर हातोडा! विटा एमडी ड्रग्ज प्रकरणात एलसीबीची धडक कारवाई

सांगली जिल्ह्यासह अख्ख्या राज्याच्या डोकेदुखीचे कारण येथील विटा एमडी ड्रग्ज प्रकरण ठरले आहे. या प्रकरणात एलसीबीने मोठी कारवाई करत माऊली इंडस्‍ट्रिजच्या मालकीणीस अटक केली आहे. एमडी ड्रग्ज प्रकरणावरून जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून पोलिसांच्या कामावरच आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशातच हा मुद्दा जिल्हा नियोजन समितीच्या पहिल्याच बैठकीत गरम झाल्याने शाळा, महाविद्यालयांच्या कुंपन भिंतीला लागून असलेल्या पान टपऱ्यांचा मुद्दा देखील चर्चेला आला. यामुळे आता अशा पानटपऱ्यांवर हातोडा चालवला जाणार आहे.

शाळा, महाविद्यालयांच्या कुंपन भिंतीला लागून असलेल्या पान टपऱ्यांची माहिती घेण्याचे काम अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने सुरू केले आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील पुढच्या आढावा बैठकीत याबाबत माहिती घेणार आहेत. यानंतरच अशा टपऱ्यांची उचलबांगडी केली जाणार असून स्थानिक राजकारण्‍यांना हाताशी धरून शाळा परिसरात मावा, गुटखा, गांजाचे अड्ड्यांवर आता हातोडा चालणार आहे.