आटपाडी (Aatpadi) जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना मुख्यालयी (headquarters)राहण्याबाबत अट रद्द करण्यासाठी शासन सकारात्मक आहे. शासनाच्या वतीने लवकरच यासंबंधी योग्य ते आदेश काढण्यात येतील,असे आश्वासन राज्याचे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
बोराटवाडी येथे झालेल्या भेटीवेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना मंत्री गोरे यांनी ही भूमिका स्पष्ट केली. या भेटीमध्ये सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे पदाधिकारी यु . टी . जाधव, आटपाडी तालुकाध्यक्ष संजय करवीर, उपाध्यक्ष संतोष पिसे, तसेच शांताराम यादव,बाळासाहेब ठोंबरे ,सत्यजित भांबुरे, सतीश पुसावळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
शिक्षकांच्या दीर्घकाळच्या मागणीला प्रतिसाद देऊन शासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याने शिक्षकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. शिक्षकांतून याबाबत सकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत.
