विटा खानापूर तालुक्यातील रेवणगाव खुर्द (धोंडगेवाडी) येथील महिलेला महादेव मंदिरामध्ये अभिषेक करण्यास मज्जाव करून तिला हाकलून बाहेर काढल्याच्या घटनेचे शनिवारी तीव्र पडसाद उमटले. या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी फकिरा पँथर सेनेच्यावतीने प्रदेशाध्यक्ष वीरू बापू फाळके यांच्या मार्गदर्शनाखाली महाअभिषेक आंदोलन केले. तुम्हाला मंदिराच्या आत प्रवेश नाही, आता आमचा नियम सुरू झाला आहे असे म्हणत एका माहेरवाशीण महिलेला मंदिरातून बाहेर काढल्याची घटना सोमवारी रेवणगाव खुर्द (धोंडगेवाडी) गावात घडली होती. याप्रकरणी विटा पोलिस ठाण्यात शोभा सूर्यवंशी आणि महादेव सूर्यवंशी (दोघेही रा. रेवणगाव खुर्द-धोंडगेवाडी) यांच्याविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.
या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रत्यक्ष विटा येथील तहसील कार्यालयावर फकिरा पँथर सेनेच्यावतीने अभिषेक आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी ज्या ठिकाणी महिलेचा अपमान झाला त्याच ठिकाणी सन्मानाने पूजा
धोंडगेवाडी या ठिकाणी घेऊन संबंधित महिला आणि राधेश्याम जाधव, अरुण पवार यांच्याहस्ते महाअभिषेक केला. यावेळी राधेश्याम जाधव, मनोज माने, सयाजी सकट, महेंद्र लोंढे, अनिल लोंढे, सदाशिव लोंढे उपस्थित होते.