शिरोळ येथील शिवाजी चौकात हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून प्रचंड मताधिक्य घेऊन आमदार पदी निवडून आल्याबद्दल शिरोळकरांच्यावतीने आयोजित नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. शिरोळ येथील जयभवानी चौक ते शिवाजी चौकापर्यंत आम. माने यांची पारंपारिक वाद्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आम. माने व रेखादेवी माने यांचा मानपत्र, चांदीची तलवार देऊन मानाचा फेटा बांधून पुष्पहार अर्पण करून नागरी सत्कार करण्यात आला.
हातकणंगलेकरांनी दिलेली साथ, नेत्यांचा आशीर्वाद आणि शिरोळकरांनी दिलेल्या पाठबळामुळे मी हातकणंगले मतदारसंघातून आमदार झालो आहे, असे प्रतिपादन आमदार दलित मित्र डॉ. अशोकराव माने यांनी केले. आ. माने म्हणाले, माझ्या नागरी सत्काराच्या निमित्ताने शिरोळ गावाने एकीचे दर्शन घडवले. शिरोळकरांच्या कायम ऋणात राहीण गेली ४५ वर्षे सामाजिक, सहकार, राजकीय क्षेत्रात काम करत असताना देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार आणि शिरोळ गावच्या जनतेने भरभरून प्रेम केले आहे.माजी आमदार उल्हास पाटील म्हणाले, शिरोळच्या सुपुत्राने हातकणंगले मतदारसंघातून आमदार म्हणून मिळवलेला विजय हा शिरोळकरांना अभिमानास्पद आहे.
आमचे नेते डॉ विनय कोरे आणि हातकणंगलेकरांनी दिलेले साथ वरिष्ठ नेत्यांनी दिलेले पाठबळ यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातून दोन नंबरची उच्चांकी तर राज्यात दहाव्या क्रमांकाची उच्चांकी मतं घेत आमदार म्हणून निवडून आलो. सर्वसामान्य कुटुंबातील माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी दिली. या संधीचे सोनं केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.