कोल्हापूर-सांगली महामार्गाचे काम पूर्ण करा

हातकणंगले, गेल्या दहा वर्षापासून रखडलेल्या सांगली – कोल्हापुर रस्त्याचे काम शेतकऱ्यांना योग्य मोबदला देऊन त्वरीत  पुर्ण करावे व शक्तीपीठ महामार्गाने शेती ने वनसंपदा व पर्यावरण धोक्यात येणार बी असल्याने तो रद्द करावा या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांच्या  नेतृत्वाखाली हातकणंगले बस  स्थानकासमोर तीव्र निदर्शने करून तहसिलदार सुशिलकुमार बेल्हेकर यांना न्य निवेदन देण्यात आले.

 गेल्या दहा वर्षांपासून कोल्हापूर- , सांगली मार्गाचे काम रखडले असून या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत , यातूनच दररोज हजारो वाहने प्रवास करत असतात. सध्या पावसाळ्याचे दिवस  असल्याने पाण्याने भरलेल्या खड्यांचा वाहन चालकांना अंदाज येत नसल्याने सातत्याने अपघात होऊन लोकांचे हाकनाक जीव जात आहेत. याबाबत वारंवार निवेदन देऊनही शासनाने केवळ आश्वासनांपलीकडे काही दिले नाही. यामुळे आंदोलन करण्याची वेळ आली आहे.

या आंदोलनास माजी जि.प. सदस्य महेश चव्हाण, पं.स.सदस्य पिंटू मुरूमकर, अनिल खवरे, स्वप्निल मगदुम, बाबासाहेब शिंगे, देवाशीष भोजे, योगेश चव्हाण, संदीप दबडे, धोंडीराम कोरवी, संदीप पाटील, अभिनंदन सोळंकुरे, प्रसाद पाटील, सुरेश खोत, शरद पोवार, उदयसिंह शिंदे, सागर चोपडे, सागर जाधव, यांच्यासह शिवसैनिक, युवासैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.