वाळवा तालुक्यातील पेठनाका येथे भाजपा जनसंपर्क कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला विजय मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांनी हा जल्लोष केला. यावेळी वनश्री दूध संघाचे अध्यक्ष व भाजपा नेते सम्राट महाडीक उपस्थित होते. कार्यकर्त्यांना पेढे भरवत व फटाक्यांची आतषबाजी करत विजयोत्सव साजरा करण्यात आला. सम्राट महाडीक म्हणाले, दिल्लीची जनता ‘आप’च्या नेत्यांच्या भ्रष्टाचाराला कंटाळली होती. जनतेने त्यांना जागा दाखवून दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जनतेचा विश्वास आहे. यावेळी जयकर कदम, भाजपचे सरचिटणीस संग्राम गोइंगडे, बबन शिंदे, अॅड. पार्थ शहा, अशोक पाटील, इंद्रजित पाटील, दौलत पवार, सूरज पवार, प्रशांत कुंभार उपस्थित होते.
वाळवा तालुक्यातील पेठनाका येथे भाजपा जनसंपर्क कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी जल्लोष
