इस्लामपूर शहरात अनेक नवनवीन कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याला उत्स्फूर्त सहभाग देखील पहायला मिळतो. अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा इस्लामपूर आणि राजारामबापू ज्ञान प्रबोधिनीच्या वतीने आ. जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दि. १४ ते १६ फेब्रुवारी अखेर २४व्या राज्यस्तरीय जयंत करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रा. श्यामराव पाटील व सूरज चौगुले यांनी दिली.
राजारामबापू येथील पाटील नाट्यगृहात शुक्रवार, दि. १४ रोजी सायंकाळी ही स्पर्धा सुरू होईल. या स्पर्धेमध्ये मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर व सांगली जिल्ह्यातील संघ सहभागी होणार आहेत. हौशी कलाकारांनी तयार केलेल्या एकांकिका पाहण्याची संधी नाट्यरसिकांना मिळणार आहे. १६ फेब्रुवारीला सायंकाळी बक्षीस वितरण होणार आहे.
