केंद्र सरकारने 2025-26 या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या घोषणा केल्या. शेतकऱ्यांसाठी अनेक चांगल्या गोष्टी करण्याचा सरकारचे धोरण आहे. याचाच एक भाग म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी होय.आता शेतकऱ्यांना मोठी आनंदाची बातमी आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधीमध्ये (पीएम-किसान) योजनेअंतर्गत, केंद्र सरकार लवकरच या योजनेचा 19 वा हप्ता जारी करणार आहे. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा 19 वा हप्ता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan) फेब्रुवारीच्या अखेरीस जारी केला जाईल.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 फेब्रुवारी रोजी बिहारला भेट देतील. या दरम्यान, ते शेतीशी संबंधित विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील आणि त्याच दिवशी पंतप्रधान किसान योजनेचा 19 वा हप्ता देखील वितरित करतील.